हिंगोणा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात संपन्न

हिंगोणा ता, यावल
भालोद मंडळ (ता. यावल) येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी फैजपुर बबनजी काकडे तसेच यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरामध्ये नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये जिवंत सातबारा वाटप अंतर्गत एकूण ११९ वारस नोंदींपैकी १३ प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. उत्पन्न दाखले १२, शिधापत्रिका ९, जात प्रमाणपत्रे ११, अधिवास व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे ८ वाटप करण्यात आली.

तसेच तुकडा शेरा कमी करण्यासाठी एकूण १३२४ सातबारा प्रकरणांपैकी ११०३ पात्र प्रकरणे निश्चित करण्यात आली असून त्यापैकी ११ प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. विशेष अर्थसाहाय योजनेअंतर्गत ११२ लाभार्थ्यांना मदत देण्यात आली. लक्ष्मी मुक्ती सातबारा ३, आदिवासी खातेदार नोंदी ४, घरकुल लाभ २५, आयुष्मान कार्ड २१, बेबी किट २१ तसेच ट्रॅक्टर वाटप २ लाभार्थ्यांना करण्यात आले.
यावेळी बबनजी काकडे, मोहनमाला नाझीरकर, अनिल सुरवाडे, सचिन जगताप तसेच भालोद मंडळातील सर्व तलाठी उपस्थित होते.

कार्यक्रमास भाजपा यावल तालुका अध्यक्ष सागर कोळी, कृषी भूषण नारायण बापू, कृषी उत्पन्न बाजार समीती यावल संचालक सागर महाजन, भाजपा यावल तालुका सरचिटणीस भरत पाटील, भाजपा रावेर तालुका अध्यक्ष सुर्यकांत देशमुख, प्रीती राणे, प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्यासह लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवून प्रशासनाने जनतेच्या दारात सेवा उपलब्ध करून दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने