हिंगोणा येथे आज छत्रपती शिवाजी महाराज “महाराजस्व समाधान शिबिर”

७/१२ दुरुस्ती, पडताळणी व फेरफार सेवांना प्राधान्य


प्रतिनिधी | यावल : 

छत्रपती शिवाजी महाराज “महाराजस्व समाधान शिबिर अभियान” अंतर्गत आज (दि. १५ एप्रिल २०२६, बुधवार) रोजी हिंगोणा ता. यावल येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर पशुवैद्यकीय दवाखाना, हिंगोणा येथे सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत पार पडणार असून विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी व समस्या जागेवरच सोडविण्यात येणार आहेत.

या शिबिरात भालोद, हिंगोणा, डोंगर कठोरा, सांगवी बु., अट्रवल, चितोडा, बोरखेडा बु. या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

शिबिरामध्ये नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये विविध दाखले वाटप, ७/१२ उतारा दुरुस्ती व पडताळणी, ई-फेरफार नोंदी, पीक नुकसान तक्रारींची नोंद, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तक्रारींवर सूचनांनुसार कार्यवाही, सामाजिक व इतर शासकीय योजनांचा लाभ, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा, अपंग दुरुस्ती हेल्प डेस्क, आयुष्मान व आरोग्य योजना सेवा तसेच कृषी संबंधित मार्गदर्शन यांचा समावेश आहे.

“न्याय आपल्या दारी – समाधान आपल्या हाती” या उद्देशाने आयोजित या शिबिरात सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहून तक्रारींचे तात्काळ निराकरण करतील.

आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार हे शिबिर आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने