चितोडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

चितोडा : ता यावल
 महामानव डॉ आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चितोडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील २०११ च्या नियोजित स्मारक जागेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
चितोडा येथील सामाजिक कार्यकर्ते किरण तायडे यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमादरम्यान डॉ बाबासाहेबआंबेडकर यांच्या नियोजित स्मारक जागेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच अरुण पाटील, माजी सरपंच तथा शिवसेना तालुकाप्रमुख कडू पाटील, सदस्य राजेंद्र हिरामण कुरकुरे, उपसरपंच चंद्रकांत जंगले, सदस्य सिंधुबाई टोंगळे, सदस्य हर्षा गोकुळ पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रविण भंगाळे, रोजगार सेवक गोपाळ भारुडे, मयूर चौधरी, राजू वानखेडे बोराडे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम तायडे, साई तायडे, अंकुर तायडे इमरान पिंजारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता सैनिक दलाचे जळगाव पूर्व जिल्हा प्रमुख संघटक सुपडू शामराव संदानशिव यांनी केले. कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने