यावल न्युज : हर्षल आंबेकर
यावल तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात गट व गणांची प्रारूप रचना जाहीर करण्यात आली आहे. तहसील कार्यालय यावल येथे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रारूप रचना प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, मंडळ अधिकारी एस.एल. पाटील, सुयोग पाटील आदी उपस्थित होते.
यावल तालुक्यात एकूण ५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गण आहेत. हे गट व गण पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले असून दिनांक २१ जुलै २०२५ पर्यंत या प्रारूप रचनेवर हरकती नोंदविता येणार आहेत. यानंतर प्राप्त हरकतींवर विचार करून १८ ऑगस्ट रोजी अंतिम गट व गणांची रचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर केली जाईल, तसेच त्यानंतर आरक्षण प्रक्रीया सुरू होईल.
प्रारूप रचना तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती सभागृहात पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.
यावल तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांची प्रारूप यादी:
1. भालोद-पाडळसे गट
भालोद गण: भालोद, बोरवल बुद्रुक, निमगाव, टेंभी, सांगवी खुर्द, चिखली खुर्द, चिखली बुद्रुक, राजोरे, अट्रावल
पाडळसे गण: पाडळसे, कोसगाव, वनोली, अंजाळे, वाघळुद, पिळोदे बुद्रुक, कासवा, अकलूद, भोरटेक, कठोरे प्र.सावदा, दुसखेडा, वडोदे प्र.सावदा, रीधुरी, करंजी
2. साकळी-दहीगाव गट
साकळी गण: साकळी, वढोदे प्र.यावल, मनवेल, दगडी, पिळोदे खुर्द, थोरगाव्हण, शिरागड, पथराडे पिंप्री, भालशिव, बोरावल खुर्द, टाकरखेडे
दहीगाव गण: दहीगाव, कोरपावली, महलखेडी, नावरे, बोराडे, चुंचाळे, विरावली, शिरागड
3. किनगाव-डांभुर्णी गट
किनगाव गण: किनगाव खुर्द, किनगाव बुद्रुक, गिरडगाव, वाघोदे, नायगाव, मालोद, वाघझिरा, ईचखेडा, खालकोट, रुईखेडे, मानापुरी
डांभुर्णी गण: डांभुर्णी, आडगाव, कासारखेडे, चिंचोली, उंटावद, डोणगाव, कोळन्हावी
4. हिंगोणा-सावखेडा सिम गट
हिंगोणा गण: हिंगोणा, चितोडे, डोंगरकठोरा, बोरखेडे खुर्द, सांगवी बुद्रुक
सावखेडा सिम गण: गाडऱ्या, जामण्या, उसमळी, लंगडाआंबा, मोहराळे, हरिपुरा, अंबापानी, वड्री खुर्द, परसाळे बुद्रुक, सातोद, कोळवद
5. न्हावी-मारुळ गट
न्हावी गण: न्हावी, आमोदा, पिंपरुड, विरोदा
मारुळ गण: मारुळ, चारमळी, बामणोद, बोरखेडे बुद्रुक, हंबर्डी, म्हैसवाडी
निवडणूक प्रक्रियेसाठी महत्त्वाची पायरी असलेली ही प्रारूप रचना प्रसिद्ध झाल्याने तालुक्यातील नागरिक व इच्छुक उमेदवार यांच्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. नागरिकांनी वेळीच हरकती नोंदवून आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.