यावल :
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या चुंचाळे गाव शिवारात गेल्या काही दिवसापासुन बिबट्याचा वावर असल्याचे परिसरातील शेतकरी व शेतमजुरांकडून बोलले जात असुन, बिबट्या परिसरात फिरत असल्याच्या चर्चेने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी असे असतांना वन विभागाचे या विषयाकडे पुर्णपणे लक्ष नसल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे
यावल तालुक्यातील वनविभागा अंतर्गत पश्चिम क्षेत्रात येणाऱ्या चुंचाळे या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या शिवारातील गुलशेर रमजान तडवी यांच्या शेतात गावातील बंडू कुंभार (वायरमन ) म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीला दोन दिवसापुर्वी हा बिबट्या वावरतांना दिसुन आला,काही महीन्यां पुर्वी देखील हाच बिबट परिसरातील अनेक शेतकरी व शेतमजुरांना ग्रामस्थांना दिसुन आला होता.
दरम्यान यावलच्या वनविभागा च्या वतीने या विषयाला गांर्भीयांने न घेतले गेले नसल्याने हा बिबट पुनश्च परिसरात वावरतांना दिसुन येत असल्याने आता तरी यावल पश्चिम क्षेत्राच्या वनविभागाने तात्काळ दक्षता घेवुन काही अप्रिय घटना होण्या आदीच नियोजन करून बिबटला आवर घालावा अशी अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहे .