Hingone news हिंगोणा शिवारात बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून वाचवला जीव

यावल न्युज

यावल तालुक्यातील हिंगोणा शिवारात दि १ गुरुवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतकरी हे शेतातील पाणी बदलण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्याचा प्रत्यक्ष अनुभव आला.
सविस्तर वृत्त असे की, निलेश बोंडे हे शेतात गेले असता त्यांना काहीतरी हालचाल आणि आवाज जाणवला. त्यांनी त्या दिशेने पाहिल्यानंतर समोरच त्यांना बिबट्या दिसला. हे पाहून ते घाबरले व तत्काळ शेतातच धाव घेतली. सुदैवाने शेजारील शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टर सुरू असल्यामुळे त्यांनी त्या ट्रॅक्टरवर जाऊन आसरा घेतला आणि त्यांचा जीव वाचला.


या घटनेची माहिती त्यांनी त्वरित वनविभागाचे अधिकारी स्वप्नील फटांगळे यांना दिली. त्यांनी वन कर्मचारी आर.एम. जाधव, वनपाल वस्ती पथक, भैय्यासाहेब गायकवाड (यावल तपासणी वनरक्षक), सचिन तडवी (पोलीस) यांना घटनास्थळी पाठवले. संबंधित पथकाने घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.

तसेच गावातील मोटकरे शिवारातील शेतीमध्ये सुद्धा दि 2 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मजुरांना बिबट्या व दोन बछडे दिसून आले . 

तसेच मोर धरण परिसरात सुद्धा तीन दिवसा पुर्वी तेथील कर्मचारी सुरक्षा रक्षक यांना बीबट्या दिसून आला.

वनविभागाने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, शक्यतो ग्रुपने जावे, सोबत बॅटरी ठेवावी, मोठ्या आवाजात गाणी लावावीत आणि बोलत राहावे, असे मार्गदर्शन केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने