बु्ऱ्हाणपुर अंकलेश्र्वर NH-७५३ बी रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास गती आवश्यक भूसंपादनासाठी अधिसूचना जारी

यावल 
 यावल तालुक्यातून जाणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच -७५३ बी (तळोदा ते बऱ्हाणपूर) या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती आली असुन, या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. या अनुषंगाने संबंधित गावांतील जमीन संपादनासाठी भूमी संपादन अधिनियमर२०१३ च्या कलम ३ ए अंतर्गत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील फैजपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी दिलेल्या पत्रानुसार,तळोदा ते बुऱ्हाणपुर या राष्ट्रीय महामार्गासाठी चिंचोली,कासारखेडा,डोणगाव,किनगाव बु., गिरडगाव,वाघोदे,साकळी, वाघोदे प्रगणे.शिरसाड, विरावली बु.यावल, चिंतोडा, सांगवी बु.हिंगोणे,हंबर्डी व फैजपूर या गावांमधील जमीन चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात येणार आहे.

सदर अधिसूचना दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यानुसार संबंधित जमिनीवरील कोणतेही नवीन बांधकाम, झाडे तोड किंवा मालकी हक्कात बदल करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच सदर जमीन “प्रस्तावित भूसंपादन” म्हणून घोषित करण्यात आली असून, या प्रक्रियेबाबत नागरिकांनी व जमीनधारकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या चौपदरीकरणामुळे यावल तालुक्यासह परिसरातील दळणवळण अधिक सुरळीत होणार असून, औद्योगिक व व्यापारी विकासाला चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने