यावल (प्रतिनिधी) –
यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या सौ. छाया अतुल पाटील यांनी १४,१०६ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. भारतीय जनता पार्टीच्या रोहिणी उमाकांत फेगडे यांना ९,०५६ मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या स्वाती मनोहर पाटील यांना ७३४, तर अपक्ष शबानाबी आरिफ सुलेमानी यांना २०६ मते मिळाली.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीत एकूण ११ प्रभागांतील निकाल जाहीर झाले असून अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या.
प्रभागनिहाय निकाल (मतांसह)
प्रभाग क्र. १
१-अ (अ.जा.) – अपक्ष शिला श्रीधर सोनवणे (५७९) विजयी; तायडे छाया कौतिक (एमआयएम) ३२८, सोनवणे पूनम देविदास (भाजप) ३२६, गजरे अजय विजय (राष्ट्रवादी) २१६, सोनवणे मनोहर बाबु (काँग्रेस) १५२, सावकारे यशोदाबाई पंडित (शिवसेना) ३९.
१-ब (सर्वसाधारण महिला) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमेनाबी शाकीर खान (७०२) विजयी; मोमीन सुमय्या शेख समीर (अपक्ष) ३४४, निगार बी मोहम्मद अरशद (काँग्रेस) ३०३, महाजन रत्नाबाई गणेश (भाजप) २५४, बारी रंजना निळकंठ (शिवसेना) ३५.
प्रभाग क्र. २
२-अ (अ.ज.) – भाजपच्या रुबाब महमंद तडवी (१,१९२) विजयी; तडवी हुसेन जहांगीर (उबाठा) ६८५, तडवी मनोज लुकमान (शिवसेना) ५९९, ठाकुर संतोष राम (अपक्ष) ६३.
२-ब (सर्वसाधारण महिला) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंजुम बी कादीर खान (१,२८०) विजयी; फेगडे वंदना भूषण (भाजप) ९२३, चौधरी भारती अभिमन्यु (उबाठा) २९५, सोनार ज्योती नितीन (शिवसेना) ३३, पाटील सरला रितेश (अपक्ष) ३४.
प्रभाग क्र. ३
३-अ (ना.मा.प्र. महिला) – काँग्रेसच्या शाहीन बानो शे. रज्जाक (९१०) विजयी; खाटिक जुबेदाबी शेख (राष्ट्रवादी) ७२८.
३-ब (सर्वसाधारण) – अपक्ष इमाम रजा समीर खान (१,३५५) विजयी; शे. असलम शे. नबी (काँग्रेस) ८०६, बारी राजेंद्र शामराव (शिवसेना) ९०.
प्रभाग क्र. ४
४-अ (अ.जा. महिला) – काँग्रेसच्या शालुबाई भालचंद्र भालेराव (१,१७२) विजयी; जंजाळे लता अनिल (भाजप) ३३४, लोखंडे समिता अरुण (राष्ट्रवादी) १८२.
४-ब (सर्वसाधारण) – काँग्रेसचे साबी साबी कमरुत्री (१,०८५) विजयी; खा सईदा बी सलाम (राष्ट्रवादी) ४६१, भालेराव सदानंद पंडित (शिवसेना) १२५.
प्रभाग क्र. ५
५-अ (ना.मा.प्र.) – काँग्रेसचे निसार हमीद शेख (८२२) विजयी; पिंजारी एजाज कादर (अपक्ष) ७१८, कुरेशी गणी साबीर खान (अपक्ष) ५५८, खाटीक अजहर अनवर (अपक्ष) ४४.
५-ब (सर्वसाधारण महिला) – काँग्रेसच्या सईदा बी मोहम्मद याकूब (१,०९१) विजयी; खान रुक्सारजबीन जामीर (अपक्ष) १,०४२.
प्रभाग क्र. ६
६-अ (ना.मा.प्र. महिला) – काँग्रेसच्या रुबीना उमर कच्छी (१,५८०) विजयी; शाहीन बी शेख रशिद (अपक्ष) ४२१.
६-ब (सर्वसाधारण) – अपक्ष करीम कासम कच्छी (१,०९८) विजयी; मनियार तनवीर करीम (काँग्रेस) ८५०, सपकाळे जागृती सागर (शिवसेना) ६७.
प्रभाग क्र. ७
७-अ (ना.मा.प्र. महिला) – भाजपच्या कल्पना दिलीप वाणी (९४४) विजयी; धोबी रेखाबाई संतोष (उबाठा) ६३९, बडगुजर आशा शांताराम (अपक्ष) ४६६.
७-ब (सर्वसाधारण) – अपक्ष पराग विजय सराफ (८७६) विजयी; गडे सुरेखा सुरेशचंद्र (भाजप) ५७४, कोळी शरद रंगु (उबाठा) ३४३.
प्रभाग क्र. ८
अ (सर्वसाधारण महिला):
बारी संध्या पुंडलिक - भारतीय जनता पार्टी(८३८)
बारी वैशाली निलेश - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)(१६००) विजयी.बारी सुनिता संजय - अपक्ष(७४)
८-ब (सर्वसाधारण) – उबाठा गटाचे सागरकुमार सुनील चौधरी (१,६२६) विजयी; बारी गोविंदा मधुकर (भाजप) १,०३६.
प्रभाग क्र. ९
९-अ (सर्वसाधारण महिला) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा निरज चोपडे (१,१७४) विजयी; महाजन देवयानी गिरीष (भाजप) ७१३.
बारी मनिषा नितीन ४२
९-ब (सर्वसाधारण) – भाजपचे राकेश मुरलीधर कोलते (१,३९७) विजयी; कचरे राहुल राजेंद्र (उबाठा) ५०४.
प्रभाग क्र. १०
१०-अ (ना.मा.प्र.) – भाजपचे योगेश विजय चौधरी (७०७) विजयी; करांडे राजेश कमलाकर (अपक्ष) ६३१, चौधरी युवराज विश्वनाथ (उबाठा) २६४.
१०-ब (सर्वसाधारण महिला) – भाजपच्या नंदा राजेंद्र महाजन (१,३००) विजयी; कोळी जागृती दुर्गादास (उबाठा) २४१.
मेघा विजय कासार ३९
प्रभाग क्र. ११
११-अ (अ.ज. महिला) – भाजपच्या सविता विजय नन्नवरे (२,१२८) विजयी; कोळी सुरेखा शरद (उबाठा) १,४०६.
११-ब (ना.मा.प्र.) – भाजपचे हेमराज जगन्नाथ फेगडे (१,७२३) विजयी; पाटील अतुल वसंत (उबाठा) १,५०६.
चौधरी मधुकर मुरलीधर ३२१
११-क (सर्वसाधारण महिला) – भाजपच्या शुभांगी रोशन यवले (१,३६४) विजयी; शिंदे मिरा नरेंद्र (उबाठा) ९१७, अडकमोल आशालता वासुदेव (शिवसेना) ९११, शिके पुजा विशाल (अपक्ष) ४०२.
पक्षनिहाय बलाबल
भाजप – ७, काँग्रेस – ६, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ३, शिवसेना (उबाठा) – २, अपक्ष – ४.
नगराध्यक्षपदी छाया अतुल पाटील यांच्या विजयामुळे नगरपालिकेच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून आगामी काळात सत्तास्थापन व विकासकामांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.