यावल पुर्व वनविभागाच्या धडक कारवाईत मोटर वाहनासह ४ लाख ५०हजार रूपयांचा अवैद्य तोडीचा लाकूड मुद्देमाल जप्त

यावल ( प्रतिनिधी ) 

यावल वनविभागाच्या पथकाची वृक्षतोड माफीयाच्या विरूद्ध धडक कारवाई रात्री २२:२५ वाजेच्या सुमारास यावल पुर्व चे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मिळालेल्या गुप्त माहीती वरुन मोहमांडली राऊंड पथकासह यावल फैजपूर रस्त्याने गस्त करीत असतांना संशयित ट्रक क्रमांक एमएच -१९ झेड२४९९ वाहनांची तपासणी केली असता वाहणात निंब,बाभूळ,चिचलो प्रजातीचा जळाऊ लाकूड माल वाहतूक करीत असतांना मिळुन आले,
वाहन चालक शेख मोहिनुद्दीन शेख उद्बोदिन रा. रावेर ता.रावेर जि. जळगाव यांना सदर मालाची वाहतुक पास बद्दल विचारना . असता त्यांच्या कडे कोणत्याही प्रकारचा वाहतुक परवाना मिळून आला नाही. सदरील वाहन तसेच जळाऊ लाकूड माल घ.मी १२ भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ ( २ ब )41४२,५२ अन्वये व महाराष्ट्र नियमावली २०१४ चे नियम ३१,८२अन्वये जप्त निंब,बाभूळ,चिचोल प्रजातीचा जळाऊ लाकूड माल१२ घन मीटर माल किंमत १०२४८/-रु तसेच वाहन किंमत अंदाजे ४ लाख५०,००० असे एकूण ४ लाख ६०हजार २४८ इतक्या किमतीचे असुन, मुख्य विक्री केंद्र यावल येथे पावतीने जमा केला.                                                    

गुन्हे कामी आगार रक्षक बि बि गायकवाड यावल यांनी गुन्हा क्रमांक ०४ / २०२५ दिनांक२५डिसेबंर अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून,सदरील कारवाई ही उप वन संरक्षक यावल वन विभाग जळगाव, सहाय्यक वन संरक्षक जमीर शेख यांच्यासह (प्रादेशिक व कॅम्पा) यावल चे समाधान पाटील,यावल पुर्व विभागा चे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यवाही दरम्यान मोहमांडली राऊंड पथक व आगार रक्षक यावल व वाहन चालक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने