सांगवी बु!! येथील कृष्णाई महिला भजनी मंडळाचा धार्मिक देणगीचा आदर्श उपक्रम

तालुका प्रतिनिधी: 

सांगवी बु|| येथील श्री हनुमान मंदिर ट्रस्ट अंतर्गत प्रभु श्रीरामचंद्र भगवान, श्री हनुमान आणि भगवान महादेव मंदिराचे नवनिर्माण व जीर्णोद्धार कार्य मोठ्या उत्साहात सुरू आहे. या धर्मकार्याला ग्रामस्थ तसेच भक्त वर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर “कृष्णाई महिला भजनी मंडळ, सांगवी बु||” यांच्या वतीने धार्मिक कार्यासाठी एक स्तुत्य पुढाकार घेण्यात आला. मंडळातील महिलांनी विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये गीता पारायण, देवीचे पाठ आदी उपक्रम राबवून त्यातून मिळालेल्या दक्षिणा/मानधनातून त्यांनी ₹११,१११/- (अकरा हजार एकशे अकरा रुपये) इतकी देणगी श्रीराम-हनुमान-महादेव मंदिर, सांगवी बु|| नवनिर्माण व जीर्णोद्धार कार्यासाठी अर्पण केली.

या देणगीबद्दल मंदिर ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी कृष्णाई महिला भजनी मंडळाच्या सर्व सदस्यांचा मनःपूर्वक सत्कार व अभिनंदन केले.

मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले की, “महिलांचा हा श्रद्धाभाव आणि सहभाग हा संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा भक्तिमय कार्यातूनच समाजात धार्मिकता, एकता आणि सेवाभाव वाढतो.”

धर्मकार्याच्या सेवेसाठी आई जगदंबा सर्वांना निरंतर शक्ती, संपत्ती आणि उत्तम आरोग्य देवो, अशी प्रार्थना सर्व भक्तांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने