फैजपूर प्रतिनिधी
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० क मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवार अमिता हेमराज चौधरी यांना माजी नगरसेविका यांना व हेमराज चौधरी यांना ललित चौधरी यांनी थेट खुले आव्हान देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ललित चौधरी यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटले आहे की, “आपण हेमराज चौधरी व पत्नी १९९६ पासून आळीपाळीने नगर सेवक व नगर अध्यक्ष आहेत . फैजपूरातील नागरिक आपल्याला ‘किंगमेकर’ म्हणत होते. आपण चार पक्ष बदलले, अनेक प्रभागातून निवडूनही आलात. तरीही, तीस वर्षांच्या राजकारणात विकासाचा ठोस मागोवा कुठे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
चौधरी यांनी शहरातील विकासकामांवरील दुर्लक्षाचा मुद्दा अधोरेखित करत म्हटले की,
“आजही पांडुरंग नगर तसेच आजूबाजूच्या कॉलनींमध्ये पिण्याच्या पाण्यात गटारीचे पाणी मिसळते. आसाराम नगर व लक्ष्मी नगर आणि परिसरातील रस्त्यांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. फैजपुरच्या नगरपालिकेची दुर्दशा सर्वांना माहिती आहे. नगरसेवक असूनही या भागातील विकासाबद्दल आपली जबाबदारी दिसत नाही.” व मागील पाच वर्षात आपण या प्रभागात तोंड सुद्धा दाखवलेले नाही
ते पुढे म्हणाले की, २०२०–२१ या काळात रस्ते विकासासाठी मंजूर झालेले ₹५ कोटी २१ लाख रुपये परत गेले, हे गंभीर अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले. “हे पैसे कसे परत गेले? यातील काही रक्कम जरी वापरली असती तरी शहरातील रस्ते, वा इतर मूलभूत सुविधा सुधारण्या शक्य होत्या,” असा आरोप त्यांनी केला.
यासोबतच त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत म्हटले की, “एकनाथराव खडसेंनी आपल्याला दूध संघात संधी दिली. तरीही आपण त्यांच्याशी गद्दारी केली. खडसे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला त्यावेळी तुम्ही सुद्धा खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता व आज लगेच आपण भाजपात प्रवेश करून भाजपाची उमेदवारी मागितली पक्षाने उमेदवारी डावल्ली पक्षाने थांबायला सांगितल्यावर सुद्धा आपण अपक्ष उमेदवारी दाखल केली आपली एकनिष्ठता कुठे आहे आपण कधी थांबणार नवीन चेहऱ्यांना कधी संधी देणार आपला व्यवसाय हा राजकारण झालेला असल्याचे सध्या दिसत आहे म्हणूनच शहराच्या राजकारणात वावरणाऱ्यांना आता त्याना घरी बसवण्याची वेळ आली आहे.”
या खुल्या आव्हानामुळे प्रभाग क्रमांक १० क मधील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. आगामी दिवसांमध्ये या आरोपांवर हेमराज चौधरी यांची प्रतिक्रिया काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.