यावल येथे आज महाविकास आघाडीची महारॅली; सेनेचे उपनेते नितिन बानगुडे पाटील यांची जाहीर सभा

यावल (प्रतिनिधी)

येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. छायाताई अतुल पाटील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज ३० नोव्हेंबर २०२५ रोजी महाविकास आघाडीकडून मोठ्या महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने या प्रचार रॅलीत तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शिवसेना व युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच मित्रपक्षांचे प्रमुख कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रचंड महारॅलीचा प्रारंभ
दुपारी २ वाजता रॅलीची सुरुवात श्री मनुदेवी मंदिर, फैजपूर रोड, यावल येथून होणार असून रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत मतदारांशी संपर्क साधणार आहे.

भव्य महासभा
रॅलीनंतर संध्याकाळी ५ वाजता श्री शिवतीर्थ, बोरावल गेट, यावल येथे विशाल जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुलुख मैदानी तोफ, इतिहास अभ्यासक व पक्षाचे उपनेते नितिन बानगुडे पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

निवडणुकीच्या प्रचाराला वेग देणाऱ्या या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजित पक्षसंघटनांकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने