यावलः
रावेर मतदारसंघात आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांवर विश्वास व्यक्त करत न्हावी येथील उभाठा आणि काँगेस मधील अनेक पदाधिकारी आणि सदस्यांनी आज आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात भाजपमध्ये प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यात न्हावीचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच देवेंद्र चोपडे, उपसरपंच चेतन इंगळे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास चोपडे, महादेव मंदिराचे अध्यक्ष वामन नेहते, विकास सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर झोपे, मल्टी सहकारी सोसायटीचे संचालक विलास चौधरी, तसेच डिगंबर गाजरे, वामन तायडे, नेमीदास भंगाळे, चेतन झोपे, सोनू झोपे यांच्यासह काँग्रेस व उभाठा पक्षातील अनेक पदाधिकारी आणि सदस्यांनी प्रवेश केला.
या मोठ्या प्रमाणातील प्रवेशामुळे न्हावी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपची संघटनात्मक ताकद आणखी बळकट झाली आहे. सहभागी नागरिकांनी “आमदार अमोल जावळे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास असल्यानेच हा निर्णय घेतल्याचे” सांगितले.
या प्रसंगी हिरालाल चौधरी, शरद दादा महाजन , हर्षल पाटील, नरेंद्र नारखेडे, नारायण चौधरी, गणेश नेहते, भास्कर पिंपळे, उमेश बेंडाळे, भरत पाटील यांच्या सह भाजपा पदाधीकारी उपस्थित होते.