सांगवी बु विठ्ठल मंदिरात कार्तिक मास काकड आरतीचा समाप्ती सोहळा

श्री विठ्ठल मंदिर सांगवी बु मध्ये गेल्या महिनाभरापासून पारंपरिक काकड आरतीने श्री विठ्ठलश्वराची आराधना सुरु आहें. पहाटेच्या वेळी गाभाऱ्यात ‘उठा जागे व्हारे आता l स्मरण करा पंढरीनाथा l या मंगल भूपाळीच्या स्वरांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून आरतीचा आनंद घेतला.
काकड आरतीनंतर देवाला फुलं, तुलसीदल, आणि नेवेद्य अर्पण करण्यात आले. ‘जय जय रामकृष्ण हरी’ च्या घोषात वातावरण भक्तिमय बनले. श्री विठ्ठल भजनी मंडळाच्या व बाल,आबाल- वृद्धांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात काकडा आरती संपन्न होत होती. या सोहळ्याची सांगता
उद्या दिनांक 06/11/2025 गुरुवार रोजी श्रीविठ्ठल मंदिर सांगवी बु येथे पार पडेल.
 या प्रसंगी संध्याकाळी 5 ते 6 ग्रामदिंडी प्रदक्षिणा तसेच रात्री 8 ते 10 *ह. भ. प. प्रितम महाराज सांगवीकर* यांचे काल्याचे कीर्तन होईल.
तरी भावीक भक्तांनी श्रवण सुखाचा लाभ घ्यावा हि विनंती
*रामकृष्ण हरी*
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने