यावल :
आज दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र भालोद अंतर्गत उपकेंद्र चितोडा, तालुका यावल येथे “टी.बी. मुक्त भारत अभियान” अंतर्गत निक्षय शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे आयोजन मा.डॉ. सचिन भायेकर (जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. जळगाव), मा. डॉ.विशाल पाटील (जिल्हा क्षयरोग अधिकारी, जळगाव), तसेच मा. डॉ.शांताराम ठाकूर (जळगाव) आणि मा.डॉ. राजू तडवी (तालुका आरोग्य अधिकारी, यावल) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
शिबिरास श्री.व्ही.टी. महाजन (पर्यवेक्षक), श्री.रवींद्र पवार (पर्यवेक्षक, जिल्हा क्षयरोग केंद्र, जळगाव), STS/STLS तायडे दादा व राणे दादा उपस्थित होते.
स्थानिक स्तरावर मा.सरपंच श्री. अरुण पाटील मा.उपसरपंच श्रीमती.राधिकाताई वारके ग्रामपंचायत सदस्य श्रीमती. हर्षाताई पाटील,श्रीमती. उज्वलाताई पाटील,श्रीमती. सिंधूताई टोंगळे,श्रीमती. बेबीताई पाटील,माजी सरपंच श्री. कडू पाटील,पोलीस पाटील श्री. पंकज वारके,तसेच डॉ.प्राजक्ता चव्हाण वैद्यकीय अधिकारी, डॉ.भावेश जावळे वैद्यकीय अधिकारी,डॉ.अर्चना पाचपोळे, डॉ.हर्षल चौधरी,डॉ.जाकीर पिंजारी समुदाय आरोग्य अधिकारी आणि प्रमुख अतिथी डॉ.राहुल चौधरी,आरोग्य विस्तार अधिकारी मा.श्री.डी.सी.पाटील, श्रीमती.सौ.शोभा चौधरी यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले.
शिबिरादरम्यान एकूण 61 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
त्यापैकी 21 संशयित रुग्णांची थुंकी तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले, तसेच 12 रुग्णांना एक्स-रे तपासणीसाठी पाठविण्यात आले.
सदर शिबिराचे यशस्वी आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र भालोद येथील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राजक्ता चव्हाण मॅडम,डॉ. भावेश जावळे व (समुदाय आरोग्य अधिकारी), डॉ.अर्चना पाचपोळे, डॉ.हर्षल चौधरी, डॉ. जाकीर पिंजारी तसेच आरोग्य सहाय्यक श्री.नितीन जगताप, श्री.सतीश बोरोले आ. सहाय्यिका सौ.जयश्री चौधरी, औषध निर्माण अधिकारी श्री. कुशल नेमाडे,आरोग्य सेवक श्री. अस्लम तडवी, श्री.शुभम चौधरी, श्री.अल्ताफ देशपांडे आरोग्य सेविका सौ.लता चौधरी, सौ. वैशाली महाजन, गटप्रवर्तक सौ.सविता भालेराव,मदतनीस सौ.आरती भालेराव,ड्रायव्हर श्री.कमलाकर भाऊ सर्व आशा कार्यकर्त्या यांच्या सहकार्याने करण्यात आले.
तसेच, श्री. नरेंद्र तायडे (STLS) यांनी शिबिरात उपस्थित नागरिकांना क्षयरोगाविषयी सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली.
श्रीमती.बेबीताई कडू पाटील यांनी कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिराद्वारे गावातील नागरिकांमध्ये टी.बी. प्रतिबंध, निदान व उपचाराविषयी जनजागृती निर्माण करण्यात आली.
शिबिर अत्यंत यशस्वीपणे पार पडले, यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी व स्थानिक प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार डॉ. अर्चना पाचपोळे यांनी व्यक्त केले...