हिंगोणा ग्रामपंचायत निवडणुकीवर रंगतदार चित्र : सर्वसाधारण आरक्षणामुळे उमेदवारांची भाऊगर्दी होण्याचे चीन्ह.


यावल: हर्षल आंबेकर
तालुक्यातील हिंगोणा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी यंदा सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने गावात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. कोणत्याही जाती-धर्माचा उमेदवार या पदासाठी पात्र ठरणार असल्याने इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची चिन्ह आहे. बऱ्याच जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे..

संघटनांची धावपळ सुरू
स्थानिक पातळीवर विविध सामाजिक संघटना व युवक मंडळे आपापल्या मर्जीतील उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी रणनीती आखताना दिसत आहेत. काही उमेदवारांनी आधीच गावातील प्रमुख नागरिक, माजी सदस्य, तरुण वर्ग व महिलांचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे.


प्रबळ उमेदवारांची चर्चा
हिंगोण्यात काही जुन्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यांचे सदस्य तसेच काही नवीन चेहऱ्यांचीही चर्चा रंगली आहे. गावच्या विकासकामांबाबत ठोस भूमिका मांडणाऱ्या उमेदवारांनाच जनतेचा पाठिंबा मिळेल, असा सूर नागरिकांमध्ये आहे.


गावात चर्चेचा विषय – कोण होणार हिंगोण्याचा पुढचा सरपंच?
सध्या गावात "कोण होणार हिंगोण्याचा पुढचा सरपंच?" हा चर्चेचा प्रमुख विषय बनला आहे. मतदारही विचारपूर्वक उमेदवारांचे आकलन करत असून, विकासाभिमुख दृष्टिकोन व स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारांना पसंती मिळण्याची शक्यता आहे.

आगामी काही दिवसांत निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. एक मात्र निश्चित आहे – हिंगोण्याची ही निवडणूक यंदा चुरशीची आणि रंगतदार ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने