बोराळे ग्रामपंचायत सरपंच आरक्षणाला ग्रामस्थांचा विरोध.अनुसुचीत जमातीचा एकही मतदार नाही

चुंचाळे : सुपडू संदानशिव
यावल तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण जाहीर झाल्यानंतर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावात अनुसूचित जमातीचा एकही मतदार नसतानाही आरक्षण निघाल्याने ग्रामस्थांनी हा निर्णय अव्यवहार्य व अन्यायकारक असल्याचे सांगत तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
उपसरपंच उज्जैनसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात निवडणूक आयोगाने गावातील वास्तव माहिती लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र निवेदनानंतरही आरक्षणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजीचा सूर अधिकच तीव्र झाला आहे .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने