एक अकेला सब पे भारी! यावल निवडणुकीत छाया–अतुल पाटील चर्चेत


यावल प्रतिनिधी
यावल नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक दारात येऊन ठेपली असून येत्या २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची तारीख जवळ येत असताना शहरात प्रचाराची धामधूम शिगेला पोहोचली आहे. सर्वच पक्षातील नेते, पदाधिकारी व उमेदवार मतदारांच्या दारात जाऊन थेट संवाद साधत आहेत. अशातच यावल शहरात एकच चर्चा जोरदार रंग घेताना दिसत आहे — “एक अकेला सोपे भारी!”
छाया अतुल पाटील यांचा प्रचार वेगात

महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार सौ. छाया अतुल पाटील मैदानात आहेत. त्यांच्या पतींमुळे आणि अनुभवी मार्गदर्शनामुळे उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच त्यांच्या प्रचाराला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
छाया पाटील यांच्या पती अतुल पाटील हे माजी नगराध्यक्ष असून, पूर्वी अनेक विकासकामांमुळे त्यांची ओळख शहरवासीयांमध्ये पक्की आहे. मोहिमेच्या दरम्यान घराघरात जाऊन संवाद, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि ठोस आश्वासनांची मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्यामुळे शहरात “एक अकेला सोपे भारी” ही घोषवाक्यात्मक चर्चा चांगलीच पकड घेत आहे.

भाजपकडून कडवे आव्हान

दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजपने देखील सर्वशक्तीनिशी मैदानात झेप घेतली आहे. भाजपकडून रोहिणी उमाकांत फेगडे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत.
त्यांच्या प्रचारासाठी आमदार अमोल हरिभाऊ जावळे काही दिवसांपासून यावल शहरात तळ ठोकून आहेत. याशिवाय मंत्री गिरीश महाजन आणि रक्षा ताई खडसे यांचीही सभा शहरात झाली असून पक्षातील बड्या नेत्यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत आहे.
भाजप संघटनात्मक बळावर आणि विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहे.

तरीही ‘अकेला’चा आवाज बुलंद

नेत्यांच्या सभा, पक्षीय युती आणि प्रचारयोजनांच्या पार्श्वभूमीवरही शहरातील चर्चेचा सूर वेगळाच आहे. अतुल पाटील यांचा सखोल संपर्क, अनुभवी कामकाज आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव यामुळेच नागरिकांमध्ये “एक अकेला सोपे भारी” असा नाद उमटत असल्याचे सर्वत्र चर्चा दिसून येते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने