यावल न्युज :
आद्य कवी, रामायणकार श्री महर्षी वाल्मिक यांची जयंती दिनांक ७ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा संकल्प कोळी समाज बांधवांनी केला आहे. या निमित्ताने यावल शहरातील संभाजी पेठ येथे समाज बांधवांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत महर्षी वाल्मिक जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी यावल येथील वंश हॉस्पिटलचे संचालक व नामांकित वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांची एकमताने उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी मुकेश कोळी यांची निवड करण्यात आली.
समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांची निवड पुढीलप्रमाणे झाली :
खजिनदार : महेश नन्नवरे
सचिव : मोहित सपकाळे
कार्याध्यक्ष : दुर्वेश कोळी
कोषाध्यक्ष : पवन कोळी
सल्लागार : सागर कोळी, संजय नन्नवरे, गौरव कोळी
सभासद : आकाश सोनवणे, प्रेम सोनवणे, सचिन कोळी, रोशन कोळी, आदित्य वाघ, अजय कोळी, योगेश कोळी, राजू कोळी, छोटू कोळी
समाजाच्या या बैठकीत उत्सवाचे आयोजन कशा पद्धतीने करायचे याबाबत चर्चा झाली. जयंतीच्या दिवशी समाज बांधवांच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महर्षी वाल्मिक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे व्याख्यान यासह विविध उपक्रम राबवण्याचे ठरविण्यात आले.
या समितीच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेत महर्षी वाल्मिक जयंती उत्सव भव्य व दिमाखदार करण्याचा संकल्प यावेळी सर्व उपस्थित बांधवांनी केला.
बैठकीस समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सव समितीच्या निवडीमुळे वातावरणात उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.