यावल न्युज :
राज्य सरकारच्या उदासीनतेला कंटाळून आता महसूल सेवक ( कोतवालांनी ) संविधान चौकाला आंदोलनाचे रणांगण बनवले आहे. तब्बल २४ दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून, मागण्या न ऐकल्या गेल्याने ३ ऑक्टोबरपासून तीन महसूल सेवकांनी उपोषणाचे शस्त्र उचलले आहे.
दररोज नवे आंदोलन, नवे निवेदन, तरीही सरकारच्या कानावर अजूनही शब्द पडत नाहीत! शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या आणि नागरिकांच्या कामात अडथळा निर्माण झाला असतानाही सरकार मात्र झोपेचे सोंग घेत गप्प बसले आहे. महसूल विभागाचा कणा समजले जाणारे हे सेवक अन्यायाविरुद्ध लढत आहेत, आणि सत्ताधाऱ्यांचे डोळे मात्र अजूनही मिटलेलेच!
महसूल सेवकांच्या या आंदोलनामुळे तालुक्यातील ७/१२, नामांतरण, जमीन मोजणी, शेतकऱ्यांचे अर्ज, प्रमाणपत्रे आदी महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत. शासनाने मागण्यांकडे कानाडोळा केल्यास या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
“शासनाचे यंत्रणाच अंध, बहिरे आणि निष्क्रिय झाले आहे!” असा सूर आता राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांतून उमटू लागला आहे.
शासनाने तात्काळ लक्ष देऊन या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा याचा फटका थेट जनतेला बसणार आहे.
सरकारने जागे व्हावे, महसूल सेवकांचा सन्मान राखावा – हीच जनतेची मागणी!