यावल तालुका शिवसेना प्रमुखपदी बापूसाहेब शरद कोळी यांची निवड

यावल न्युज :
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तसेच शिवसेना उपनेते व रावेर लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा संपर्क प्रमुख काकडे साहेब, जिल्हा प्रमुख दीपकसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यातील निष्ठावान व कणखर शिवसैनिक बापूसाहेब शरद रंगू कोळी यांची यावल तालुका शिवसेना प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
शरद कोळी हे पक्षनिष्ठ, दमदार नेतृत्व व सदैव कार्यकर्त्यांसाठी तत्पर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यांच्या नियुक्तीनंतर यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, गोपाळ चौधरी, संतोष धोबी, योगेश चौधरी, विजय कुंभार, पिंटू कुंभार, सुरेश कुंभार, प्रवीण लोणारी, अझहर खाटीक, बी. एम. पाटील सर, आर. के. चौधरी, सूरज कोळी, प्रदीप वानखेडे, निवृत्ती खांबायत, नितीन कोळी, संदीप माळी, सुभाष वाघ, प्रकाश वाघ, रवी सपकाळे, योगेश राजपूत पाटील, विजय कवडीवाले (पत्रकार), भरत कोळी, निलेश पाराशर आदी पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून भगव्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी शरद कोळी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना, “यावल तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिकांना बरोबर घेऊन पक्षसंघटना अधिक बळकट करणार आहोत. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाचे हात बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने कार्यरत राहणार आहे,” असे सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने