यावल न्युज :
येथे १९६५ साला पासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करत आहे.
या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गावात फक्त एकच दुर्गा देवीची स्थापना केली जाते. त्यामुळे “एक गाव, एक देवी” या उपक्रमातून गावातील ऐक्य, भक्तिभाव आणि परंपरा यांचे दर्शन घडते.
गेल्या ४० वर्षा पुर्वी स्वर्गवासी नारायण आप्पा सोनवणे व गावकऱ्याच्या माध्यमातून परंपरा जोपासत जय दुर्गा मित्र मंडळ , गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात
. नऊ दिवस संपूर्ण गावातील ग्रामस्थ व भाविक एकत्र येऊन देवीची पूजाअर्चा, सकाळ-संध्याकाळ आरती व नवसपूर्ती विधी मोठ्या श्रद्धाभावाने पार पाडतात.
या उत्सवाच्या काळात गावात एक वेगळे नवचैतन्याचे वातावरण अनुभवायला मिळते. धार्मिक विधींबरोबरच मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक, धार्मिक तसेच जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे हा उत्सव केवळ भक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर सामाजिक बांधिलकी जपणारा ठरतो.
वढोदा गावातील विशेष आकर्षण म्हणजे शिरागड येथील श्री सप्तश्रृगी देवीचा मंदिरातून अखंड पायी ज्योत आणली जाते यात सुमारे ५० ते ५५ युवकांनी पायी चालत ज्योत वढोदा प्र यावल येथे पोहोचवली जाते. मंडळाने सांगितल्याप्रमाणे, ही पायी ज्योत यात्रेची परंपरा यापुढेही कायम ठेवण्यात येणार आहे.
संपूर्ण गावातून एकच देवीची स्थापना झाल्यामुळे सकाळ-संध्याकाळ सर्व ग्रामस्थ आरतीला एकत्र जमून भक्तीमय वातावरण निर्माण करतात.
कै. नारायण आप्पा सोनवणे व नामदेव तुकाराम चौधरी यांनी दुर्गा मातेची मूर्ती गावकऱ्यां साठी अपर्ण केली आहे.
कै. रामा बाविस्कर , कै. जनार्दन चौधरी,उत्तम बापु सोनवणे, सिताराम पाटील परिश्रम घेतात.
सदर महोत्सव यावर्षी सुद्धा माजी जि प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी वडीलांची परंपरा कायम ठेवून अंखड पणे सुरू आहे याकामी दिनकर सोनवणे, तुकाराम सोनवणे, यंशवत बाविस्कर, सरपंच संदिप सोनवणे, उपसरपंच गोपाल चौधरी, राजेंद्र सोनवणे, लीलाधर सोनवणे, सुपडू सोनवणे, कीरण सोनवणे, सोपान सोनवणे, सुनिल सोनवणे, मुकेश चौधरी, नामदेव चौधरी, मुरलीधर चौधरी, चिंतामण भिल, कैलास सपकाळे सह पोलिस पाटील चेतन सोनवणे यांचे गांवकऱ्याचे सहकार्य लाभते मंडळाचा नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, गावातील एकात्मता, श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर संगम असल्याचे सर्वांनी नमूद केले आहे.
