चितोडा येथे आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन

यावल न्युज : किरण तायडे
भालोद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र चितोडा येथे नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात नागरिकांसाठी विविध तपासण्या व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरामध्ये रक्त तपासणी, बीपी, शुगर तपासणी, गर्भवती मातांची तपासणी तसेच आरोग्यमुक्त गाव या उपक्रमासंदर्भात आरोग्य शिक्षण देण्यात आले. शिबिरात एकूण १२२ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली तर ३२ आयुष्मान भारत कार्ड काढण्यात आली.

सदर शिबिराचे नेतृत्व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पाचपोळे यांनी केले. त्यांना आरोग्य सेवक असलम तडवी, यशवंतकुमार संदानशिव (समुपदेशक, ICTC विभाग, ग्रामीण रुग्णालय यावल), आशा सेविका तनुजा पाटील, कल्पना धांडे तसेच उमेद अभियानच्या सीआरपी अनिता तायडे आणि स्वयंसहायता गटांच्या महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणीसोबतच निरोगी जीवनशैलीचे महत्व, रोगप्रतिबंधक उपाययोजना व विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्याचा हेतू या शिबिरातून साध्य झाला.

याप्रसंगी गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला व शिबिर यशस्वीरित्या पार पडले.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने