यावल न्युज : दि. 10 सप्टेंबर :
यावल आगाराची यावल-हरीपुरा मार्गावरील एस.टी. बस (क्र. MH 20 BL 1596) आज विरावली गावाजवळ अपघातग्रस्त झाली. बस अचानक रस्त्याच्या कडेला उतरल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
प्रत्यक्षदर्शी प्रवासी आणि वाहतूक प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. बस रस्त्याच्या खाली उतरल्यानंतर काही क्षण गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र चालक व इतर कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
सदर घटनेमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मानसिक धक्का बसला असून यावल-हरीपुरा मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सुदैवाने या अपघातात मोठी हानी टळली