यावल न्युज : सतीष बऱ्हाटे
तालुकयातील जिल्हा परिषद शाळा विरोदा येथील शिक्षक गिरीश महाजन, यांची हिंगोणा येथे बदली झाली. याबद्दल त्यांना निरोप देताना ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. तर मारुळ शाळेतील शिक्षिका श्रीमती.संगीता गाजरे यांचे स्वागत केले. या प्रसंगी विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी शिक्षकांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामस्थ म्हणाले की, शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण झाली. शिक्षकांनी समर्पित भावनेने कर्तव्य बजावल्याचा गावातील विद्यार्थ्यांना फायदा झाला. आज गावातील विद्यार्थी अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत. येत्याकाळातही शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल. शिक्षकांनी त्यांच्या कार्यावर निष्ठा ठेवून कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमासाठी सरपंच जीवन तायडे ,उपसरपंच विनोद झाल्टे,सदस्य पंकज बऱ्हाटे,,ग्रामसेवक शिवाजी सोनवणे , ग्राम रोजगार सेवक वसीम पिंजारी ,अमोल वारके,सतीश बऱ्हाटे,नितीन चौधरी, सतीश चौधरी , जितु चौधरी,जितु खाचणे , पुरुषोत्तम पाटील, संदीप खाचणे, कोमल पाटील ,चंद्रकात बऱ्हाटे , सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.