यावल न्युज :
रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण तर्फे निवृत्त मुख्याध्यापक एस. आर. फेगडे यांना जीवनगौरव विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्लबचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी व सचिव रोहित शिंदे यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमात सहा आदर्श शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला.
मुळचे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील रहिवासी असलेले फेगडे सर यांनी ३० वर्षांच्या शैक्षणिक कार्यकाळात असंख्य विद्यार्थी घडविले असून त्यापैकी शंभरहून अधिक विद्यार्थी विविध सरकारी सेवांमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लबने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला आहे.
शिक्षक घडविण्यातील योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले प्रयत्न आणि समाजासाठी दिलेली निष्ठावान सेवा यामुळे हा सन्मान फेगडे सरांना मिळाल्याचे मत रोटरी क्लबने व्यक्त केले आहे. या गौरवामुळे शैक्षणिक क्षेत्रात भेगडे सरांचा आदर्श अधिक दृढ झाला आहे.