चुंचाळे गावात उघड्यावर स्त्री जातीचे अर्भक मिळून आल्याने परिसरात चर्चेला उधान,

यावल न्युज प्रतिनिधी : रविंद्र आढाळे 
यावल तालुक्यातील चुंचाळे गावात भरवस्तीत पोलीस पाटील यांच्या घरासमोर बखळ जागेत कुणीतरी अज्ञात स्त्रीने एक दिवसाचे जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक हे मृत अवस्थेत फेकून दिल्याची घटनासमोर आली असुन,हे कृत कोणी केले असेल या विषयाला घेवुन परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे .                        
   
 या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार चुंचाळे तालुका यावल या गावातील विलास भावलाल पाटील यांच्या बखळ जागेवर दिनांक २१ सप्टेंबर दुपारी २ वाजेच्या सुमारास चुंचाळे येथील पोलीस पाटील गणेश पाटील आपल्या शेतात जाण्यासाठी निघाले असता त्यांच्या घर क्रमांक १९२ वरील घराच्या उत्तर कडील मोकड्या जागेच्या दिशेला कुत्र्यांना जमीनीवर पडलेली काही तरी वस्तु चाटतांना दिसुन आला,गणेश पाटील यांनी त्या कूत्र्यांना हाकलुन लावले व त्या ठिकाणी पाहिले असता एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक हे मृत अवस्थेत मिळून आले,याबाबत पाटील यांनी गावात विचारपुस केली असता माहीती मिळून आली नाही म्हणुन पोलीस पाटील गणेश साहेबराव पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने त्या मृत अर्भकास उघड्यावर फेकणाऱ्या त्या महीलेच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने