यावल न्युज : किरण तायडे
अर्चना कोल्हे या २०१८ साली चितोडा शाळेत रुजू झाल्या होत्या. तब्बल सात वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिक्षण देत शैक्षणिक गुणवत्तेसह वैयक्तिक जिव्हाळा जपला. त्यामुळे शिक्षविद्यार्थी यांच्यातील नाळ घट्ट झाली होती.
बदली प्रक्रिया ऑनलाईन असल्याने त्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होणे आवश्यक आहे. मात्र त्यांच्या जाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उदासी दिसून आली. शाळेत त्यांनी दिलेल्या सेवेमुळे व प्रेमळ स्वभावामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना आपलेपणाने जोडले होते.
विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मनात त्यांनी खास स्थान निर्माण केले असून त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.