यावल न्यूज :
चिखली बुद्रुक (ता. यावल) येथे आज छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अंतर्गत सेवा पंधरवडा समाधान शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमास फैजपूर प्रांताधिकारी श्री. बबन काकडे, यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी सौ. मंजुश्री गायकवाड, निवासी नायब तहसीलदार बी. एम. पवार, महसूल नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, चिखली व म्हैसवाडीचे सरपंच तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिरात उपस्थितांना सेवा पंधरवड्याच्या तीन टप्प्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये शेत पानंद रस्ते कार्यपद्धती, शेत रस्त्यांना क्रमांक देणे, सर्वांसाठी घरे, नाविन्यपूर्ण योजना आदी बाबींचा समावेश होता. तसेच शिबिरात विविध सेवा लाभ ग्रामस्थांना वितरित करण्यात आले.
यावेळी चिखली बुद्रुक ते भालोद रस्ता या मार्गाची शिवार फेरी ग्रामस्थांच्या समवेत घेण्यात आली व स्थानिक विकासकामांची पाहणीही करण्यात आली.
या शिबिरामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम अधिक परिणामकारक ठरत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले