जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षण जाहीर; जळगावसाठी सर्वसाधारण प्रवर्ग निश्चित

यावल न्यूज प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार (दि. ६ मे २०२५) राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाचे नवे वाटप जाहीर केले आहे. या अधिसूचनेनुसार जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग निश्चित करण्यात आला आहे.
अध्यक्षपदाच्या आरक्षणामुळे जिल्हा परिषदा निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असून, सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

राज्यातील इतर जिल्हा परिषदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे :

ठाणे – सर्वसाधारण (महिला)

पालघर – अनुसूचित जमाती

रायगड – सर्वसाधारण

रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सिंधुदुर्ग – सर्वसाधारण

नाशिक – सर्वसाधारण

धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

नंदुरबार – अनुसूचित जमाती

अहिल्यानगर – अनुसूचित जमाती (महिला)

पुणे – सर्वसाधारण

सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सांगली – सर्वसाधारण (महिला)

सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला)

छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण

जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

बीड – अनुसूचित जाती (महिला)

परभणी – अनुसूचित जाती (महिला)

हिंगोली – अनुसूचित जाती

नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग

धाराशिव – सर्वसाधारण (महिला)

लातूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

अमरावती – सर्वसाधारण (महिला)

अकोला – अनुसूचित जमाती (महिला)

वाशिम – अनुसूचित जमाती (महिला)

बुलढाणा – सर्वसाधारण

यवतमाळ – सर्वसाधारण

नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

वर्धा – अनुसूचित जाती

भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग

गोंदिया – सर्वसाधारण (महिला)

चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)

गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)


या अधिसूचनेचा सविस्तर तपशील महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, अंक १२६, दि. ९ सप्टेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने