Yawal MLA and son abused माजी आमदार व पुत्रास दारूच्या नशेत शिवीगाळ, धमकी; यावल पोलिसात गुन्हा दाखल

यावल न्युज :

यावल शहरातील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या ओम झेरॉक्स दुकानाजवळ शनिवारी सायंकाळी घडलेल्या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली. अनिस उर्फ पप्पू छोटू पटेल (रा. विरार नगर, यावल) याने दारूच्या नशेत माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी व त्यांचा मुलगा धनंजय चौधरी यांचे नाव घेऊन सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ केली. तसेच, “जर ते यावल शहरातील पटेल वाड्यात आले, तर त्यांचे पाय तोडून टाकेल,” अशी धमकी दिली.
घटनेची माहिती काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मिळताच रात्री उशिरा मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला. या प्रकरणी अनिल जंजाळे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अनिस उर्फ पप्पू पटेल यांच्याविरुद्ध अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने