यावल न्युज : हर्षल आंबेकर
Glory to the meritorious people of the barber community यावल, ता. 12 ऑगस्ट – श्री जीवा महाले बहुउद्देशीय संस्था, यावल यांच्या वतीने दिनांक 11 ऑगस्ट रोजी नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सार्वजनिक वाचनालय, यावल येथे उत्साहात पार पडला. इयत्ता दहावी, बारावी तसेच पदवीपर्यंत विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाभिक संघ भुसावळ शहरचे ज्येष्ठ सदस्य पंडित सनान्से यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष (पूर्व विभाग) सचिन सोनवणे, जिल्हाध्यक्ष (पश्चिम विभाग) किशोर वाघ, अखिल भारतीय जीवा सेना जिल्हाध्यक्ष अनिल टोंगे, युवक जिल्हाध्यक्ष कुणाल गालफाडे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश सेठी, उत्तर महाराष्ट्र तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश ठाकरे, समाजसेवक सुधाकर सनान्से, संजय बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ व अखिल भारतीय जीवा सेना यांच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा देखील संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल चौधरी यांनी केले. सचिन सोनवणे यांनी आपल्या भाषणात समाजाच्या विकासासाठी संघटन महत्त्वाचे असल्यावर भर दिला, तर कुणाल गालफाडे यांनी रोजगार मेळाव्याबाबत मार्गदर्शन केले. संजय बोरसे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी विविध योजनांची माहिती दिली.
यावल तालुक्यासह जिल्ह्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जीवा महाले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी, कार्यकारिणी सदस्य, तसेच दुकानदार संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र महाले यांनी केले, तर आभार सुपडू वारूळकर यांनी मानले.