आंबापाणी येथे अंगणवाडी सेविका भरतीत गैरव्यवहार; आदिवासी महिलेला न्याय देण्याची मागणी

यावल न्युज : हर्षल आंबेकर
Malpractices in Yawal Anganwadi recruitment आंबापाणी (ता. यावल, जि. जळगाव) येथील अंगणवाडी सेविका पदाच्या भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत स्थानिक आदिवासी महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन १५ ऑगस्टपासून यावल पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा देत पॅंथर कार्यकर्ता सतिष अडकमोल व भिम आर्मी संघटनेतर्फे यावल गटविकास अधिकारी व एकात्मिक बाल विकास सेवा योजना, यावल यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अंगणवाडी सेविका भरतीसाठी ठरलेल्या निकषांनुसार स्थानिक महिला निवड होणे अपेक्षित असताना, बाहेरील महिलेला प्राधान्य देण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित महिला हरिपूरा येथे वास्तव्य करत असून, निवास देखील हरीपुरा येथेच असल्याचे सांगण्यात आले आहे. व हरीपुरा आणि आंबपाणी हे १४ की मी अंतर असल्यामुळे स्थानिक अंबापाणी येथील रहिवाशी पात्र महिलेला वंचित ठेवून बाहेरील उमेदवाराची निवड करून अन्याय झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तसेच, या संपूर्ण भरती प्रक्रियेत फसवणूक व नियमभंग झाल्याचा दावा करून, सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, १५ ऑगस्टपासून यावल पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सतीश अडकमोल यांनी दिला आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे :

आंबा पाणी येथील सेविका भरतीची अजून फक्त प्राथमिक यादी लागलेली आहे अंतिम निवड यादी 29 तारखेला लागणार त्या यादीवर जर कुणाची हरकत असेल तर त्यांनी ती रीतसर हरकत लेखी स्वरुपात कार्यालयात देणे आवश्यक आहे त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांंगितले .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने