यावल न्युज : हर्षल आंबेकर
Sangavi celebrates World Youth Day ज्योती विद्या मंदिर, सांगवी बुद्रुक येथे जागतिक युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रेड रिबन क्लब व ग्रामीण रुग्णालय, यावल यांच्या वतीने दिनांक 12 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रविंद्र भंगाळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पवन जगताप व एचआयव्ही समुपदेशक वसंत संदानशिव उपस्थित होते.
आपल्या मनोगतात वसंत संदानशिव यांनी आजच्या युवांनी अभ्यासाबरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली. “शारीरिक आरोग्य बिघडले की मानसिक आरोग्य देखील ढासळते,” असे त्यांनी सांगितले. तसेच, एचआयव्ही संसर्ग कसा होतो आणि त्यापासून कशी काळजी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. देशाचे भवितव्य युवा पिढीवर अवलंबून असून, देशाची ओळख त्याच्या युवांमुळे निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी पर्यवेक्षक सी. पी. फिरके, व्ही. एस. बावस्कर. मनीषा ताडेकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन NCC 356 ट्रूप, ज्योती विद्या मंदिर यांच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन NCC ऑफिसर पंकज भंगाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीषा ताडेकर यांनी केलेत.