के. नारखेडे विद्यालयात ‘उद्योजक आपल्या भेटीला’ कार्यक्रम उत्साहात

भुसावळ, दि. 24 –
भुसावळ येथील के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ‘उद्योजक आपल्या भेटीला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी London Bakeway चे संस्थापक तरुण उद्योजक कुणाल रविंद्र गालफाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सुमारे ४५ मिनिटांच्या मार्गदर्शन सत्रात गालफाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नोकरीसोबत स्वतंत्र व्यवसाय करणे हा उत्तम उत्पन्नाचा मार्ग असल्याचे सांगितले. तसेच नोकरीपेक्षा व्यवसाय अधिक स्थिर, यशस्वी व समाजाला रोजगार देणारा ठरतो, यावर त्यांनी भर दिला. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातूनही त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवसायाशी निगडित प्रत्यक्ष अनुभव दिला.

या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय. एन. झोपे, पर्यवेक्षक एस. पी. पाठक, खाचने सर, कापसे सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अतिथी परिचय एस. डी. वासकर यांनी केले तर आभारप्रदर्शन पाठक सर यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान गालफाडे यांच्यासोबत सहकारी राहुल शिवरामे, शुभम अमोदकर, जय ठाकुर व दिव्यांश शिंगनारे सहभागी झाले होते.

दरम्यान, ‘Entrepreneur of the Day’ म्हणून दहावीतील विद्यार्थी संम्याक याची निवड करण्यात आली. त्याला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने