यावल न्युज : हर्षल आंबेकर
Aapla Dawakhana enquiry News आपला दवाखाना" व "वर्धनी केंद्र" घोटाळा प्रकरणात दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन १५ ऑगस्टचे आमरण उपोषण स्थगित
जळगाव – भीम आर्मी भारत एकता मिशनचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी जळगाव जिल्ह्यातील "आपला दवाखाना" व "वर्धनी केंद्र" यांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत पत्रकार परिषदेत प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली होती. १४ ऑगस्टपर्यंत चौकशी समिती स्थापन न झाल्यास १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन तक्रार अर्ज सादर केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दोन सदस्यीय समिती नेमली आहे.
हेमंत भदाणे – जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, जळगाव (समिती अध्यक्ष)
विनोद चावरिया – उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी, अर्थ विभाग, जळगाव (समिती सदस्य)
ही समिती संबंधित केंद्रांवर प्रत्यक्ष तपासणी करून, तक्रारीतील मुद्द्यांची पडताळणी करणार असून १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करणार आहे.
समिती स्थापन झाल्यामुळे १५ ऑगस्ट रोजी होणारे आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती भीम आर्मी जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्ध खरे व राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.