"गरजूंना लाभ देणे हेच आमचे कर्तव्य – तहसीलदार मोहनमाला नाझीरकर

यावल न्युज : 

Yawal Tahsil Indipendent Day celebration  स्वातंत्र्य दिनानिमित्त यावल तहसील कार्यालयात ध्वजारोहण — शासकीय योजनांचे लाभार्थींना प्रमाणपत्र वितरण 

यावल : आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त यावल तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला यावल तालुक्यातील सर्व विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर तालुक्यातील शेतकरी, संजय गांधी योजना पुरवठा शाखा तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. महसूल विभागाच्या उपक्रमांतर्गत एकूण ९५०० सातबारा उताऱ्यांपैकी ४३९७ सातबाऱ्यांवरील तुकडा शेरा कमी करून वाटप करण्यात आले. या प्रक्रियेत कोतवाल (महसुल सहाय्यक) यांनी अत्यंत मेहनत घेतली असून, अनेक दफे शोधून काढण्यात यश मिळवले.

राज्यातील प्रगतीपथावरील महसूल कामांमध्ये यावल तालुक्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशामागे तहसीलदार नाझीरकर यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागातील सर्व तलाठी, कोतवाल आणि कर्मचारी यांचे समन्वयित कार्य आहे. तालुक्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून, प्रशासनाचा विश्वास आणि जनतेचा आदर मिळवण्यात त्यांनी यश मिळवले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने