यावल न्युज बामणोद :- गणेश काकडे
दादासो दयाराम देवराम माध्यमिक विद्यालय दुसखेडा येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव ए जी इंगळे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून पी एस सोनवणे सर यावल व गणेश काकडे बामणोद यांनी उपस्थिती लावली होती
प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (प्रोटान) संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथाप लेखक व शिक्षण क्षेत्रातील अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले गणेश काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल माहिती दिली तसेच अण्णाभाऊ साठेंचे वाक्य पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तिक्षावर नसून ती कामगार कष्टकरी शेतकरी हात मजूर यांच्या तळ हातावर आहे. असे सांगत अण्णाभाऊ साठे यांची फकीरा वैजंता सापडा या कथेवर प्रकाश टाकला अण्णाभाऊंचे लेखन हे काल्पनिक लेखन नसून दलित समुदायातील यातना व्यक्त करणारे लेखन आहे ज्यातून बहुजन समाजाच्या यातना जाणवतात अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कथा कादंबऱ्या पोवाडे याचे लेखन केले तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या शाळेतील ग्रंथालयांमध्ये असलेले जास्तीत जास्त पुस्तक वाचावी म्हणजेच त्यांना भविष्यात जगण्याची कला प्राप्त होईल असे सांगितले.
पी एस सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना आई-वडिलांचे उपकार व गुरुजनांचे उपकार विसरून कोणालाही मोठं होता येत नाही असे सांगत विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये अभ्यासाकडे लक्ष देऊन आपल्या आई-वडिलांची सेवा करावी व आपल्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करावा असे मोलाचे मार्गदर्शन केले. त्यासोबतच पी एस सोनवणे सर यांनी शाळेला संगणकाचा सेट भेट दिला.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली मॅडम यांनी केले तर आभार प्रज्ञा मॅडम यांनी मानले. कार्यक्रम समाप्तीनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले