बामणोद येथील असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

यावल न्युज : सतिष बऱ्हाटे 

"सबका साथ, सबका विकास" या मुलमंत्रावर विश्वास ठेवत आणि राज्याचे जलसंपदा मंत्री मा. गिरीश महाजन तसेच आमदार अमोल जावळे यांच्या प्रभावी नेतृत्वावर श्रद्धा ठेवून, यावल तालुक्यातील बामणोद येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत.
भालोद येथे नुकत्याच पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. यावेळी आमदार जावळे यांनी भाजप हा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष असून, विकासकामांच्या बळावर लोकांचा पक्षाकडे ओढा वाढत असल्याचे सांगितले.

या प्रवेश सोहळ्याला नितीन चौधरी (दूध संघ जळगाव संचालक), उमेश पाटील (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती यावल), उमेश बेंडाळे (फैजपूर मंडळ अध्यक्ष), जयश्री चौधरी (महिला मोर्चा अध्यक्ष), अमोल वारके, नरेंद्र चौधरी (फैजपूर), गिरीश ठाकूर (भाजपा अध्यक्ष, बामणोद), पुरुषोत्तम प्रकाश भोळे (उपाध्यक्ष, बामणोद), कुणाल सोनवणे (युवा मोर्चा अध्यक्ष, बामणोद) आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी पिंटू सपकाळे, सचिन सोनवणे, दीपक तायडे, युवराज सोनवणे, पंकज सोनवणे, गिरीश तळले, डीगंबर सोनवणे, सागर सोनवणे, शैलेश सोनवणे, धनराज सोनवणे, किरण सोनवणे, चेतन सोनवणे, पवन सोनवणे, विकी सोनवणे, वैभव सोनवणे, मिलिंद सोनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश करून पक्षाचे बळ वाढवले.

या पक्षप्रवेशामुळे बामणोद परिसरात भारतीय जनता पक्षाची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी राजकीय घडामोडींमध्ये या कार्यकर्त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने