छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर यावल तालुक्यातील न्हावी येथे यशस्वीपणे संपन्न – १०३५ नागरिकांना विविध लाभ

यावल न्युज : न्हावी ता. यावल 

फैजपूर महसूल मंडळाच्या अंतर्गत यावल तालुक्यातील न्हावी येथील खंडेराव मंदिर सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर योजना दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या शिबिरात विविध शासकीय विभागांतर्गत १०३५ लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
महसूल विभागामार्फत दिलेले लाभ:

जिवंत ७/१२ उतारे : १३२

तुकडा शेरा कमी : १५४

ई-हक्क नोंदणी : १६

म.ज.म.अ. १५५ दुरुस्ती : ०९

इतर हक्क व कालबाह्य शेरा कमी : ६७

रस्ता नोंद : ९


मतदार यादी अद्ययावतीकरण कार्य:

नवीन मतदार नोंदणी (फॉर्म क्र. ६) : २९

मयत नाव कमी करणे (फॉर्म क्र. ७) : ७१

नाव दुरुस्ती (फॉर्म क्र. ८) : ४५


इतर योजनांद्वारे लाभ:

संजय गांधी योजना DBT प्रक्रिया : ८२ लाभार्थी

अर्थसहाय्य वाटप : २३ लाभार्थी

आरोग्य तपासणी लाभ : २०

बेबी किट वाटप : ४

शालेय साहित्य वाटप : ४५

आरोग्य कार्ड वाटप : १२

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सेवा : ५३

ट्रॅक्टर वाटप : १

शिधापत्रिका लाभ (पुरवठा विभाग) : २६


सेतू केंद्रामार्फत सेवाः

उत्पन्न दाखले : ८९

जातीचे दाखले : ४३

वय, अधिवास व रहिवास दाखले : २३


महिला व बालकल्याण योजनांचे लाभ:

जननी सुरक्षा योजना : ४६

लेक लाडकी योजना : २२

ICDS योजना : ९

वैरण विकास : ५


या शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांची लक्षणीय गर्दी व विविध विभागांच्या प्रतिनिधींनी दिलेले तत्पर सहकार्य.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार (महसूल, संजय गांधी योजना, निवडणूक), पुरवठा निरीक्षण अधिकारी, सर्व महसूल सहायक, अव्वल कारकून, युवा प्रशिक्षणार्थी, संगणक चालक व पश्चिम भागातील महसूल मंडळी यांनी मोलाचे योगदान दिले.

या शिबिरात प्रशासन व नागरिक यांच्यातील थेट संवाद साधला गेला, आणि एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण दिसून आले.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने