बांधकाम कामगारांना भांडी योजनेत दलालांचा हस्तक्षेप; संतप्त महिलांचा यावलमध्ये रास्ता रोको आंदोलन

यावल न्युज :
Yawal Bandhkamgar strike news तालुक्यात महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाद्वारे राबविण्यात येणाऱ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठीच्या मोफत भांडी वाटप योजनेत स्वार्थी दलालांचा हस्तक्षेप वाढल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गरजू कामगार कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी संतप्त महिलांनी दि. २६ ऑगस्ट, मंगळवारी यावल शहरातील भुसावळ टी-पॉईंट येथे रास्ता रोको आंदोलन छेडले.
सदर योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केल्यामुळे दलालांचा सुळसुळाट वाढला असून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे ही योजना ऑफलाईन करण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली.

शेकडो महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करून भोंगळ कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली. या आंदोलनामुळे जवळपास एक तास वाहतुकीची कोंडी झाली. यावेळी यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी उपस्थित राहून महिलांच्या समस्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. आंदोलनाचे नेतृत्व महिला कार्यकर्त्या चंद्रकला इंगळे यांनी केले असून या आंदोलनात शेकडो महिला सहभागी झाल्या.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने