यावल न्युज : किरण तायडे
Sangavi school play News दिनांक 29 ऑगस्ट 2025, शुक्रवार रोजी ज्योती विद्या मंदिर, सांगवी बु. ता. यावल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 17 वर्षीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यावल तालुका क्रीडा अध्यक्ष श्री. के.यू. पाटील यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वनाथ धनके, उपाध्यक्ष यावल तालुका क्रीडा संघ श्री. फिरके, तसेच सचिव श्री. दिलीप संगेले उपस्थित होते.
कबड्डी स्पर्धेत पंच म्हणून श्री. रितेश विजय तायडे व श्री. सचिन वासुदेव पाटील यांनी उत्कृष्ट कार्य पार पाडले. या स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग नोंदविला. त्यातून विजेता संघ – शारदा माध्यमिक विद्यालय, साकळी तर उपविजेता संघ – जे. टी. महाजन सेमी इंग्लिश स्कूल, यावल ठरले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यावल तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक, ज्योती विद्या मंदिर चे मुख्याध्यापक श्री. आर.एम. भंगाळे सर, पर्यवेक्षक श्री. सी.पी. फिरके सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री. व्ही.व्ही. धनके सर यांनी केले. वेळाधिकारी म्हणून सौ. रेखा साळुंके मॅडम, पूजा पाटील मॅडम, सौ. भावना नेहते, सौ. प्रियंका चौधरी, तर गुणाधिकारी म्हणून श्री. पी.एम. इंगळे, श्री. बी.डी. वाघुळदे, श्री. भूषण राणे यांनी जबाबदारी सांभाळली. क्रीडा शिक्षक श्री. पी.ए. पाटील व श्री. पी.एम. भंगाळे यांचेही विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एम.एस. ताडेकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. पी.एम. भंगाळे सर यांनी केले.