यावलचे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

यावल न्युजः
यावल नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द केला.
राकेश कोलते यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले असून, कोणताही राजकीय दबाव नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी पक्षात कार्यरत असताना दिलेल्या सहकार्याबद्दल पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

या राजीनाम्यामुळे यावलमधील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पुढे ते कोणता राजकीय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने