यावल न्युज : प्रतिनिधी – इरफान शहा
Raver Indipendent Day celebration रावेर येथील महाजन अशासकीय आय.टी.आय. येथे ७८वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य अशरफ तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीताच्या गजरात परिसर दुमदुमला.
नवीन प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांनी "माझा देश – माझा अभिमान" या घोषणांनी कार्यक्रमाला रंगत आणली. प्राचार्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, अनुशासन आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश दिला.
रंगीबेरंगी पताका, तिरंगा झेंडे, फुलांची आरास आणि रांगोळीमुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निदेशक वर्ग सागर चौधरी, कृष्ण पाटील, गणेश महाजन, सागर वाघोडे, तुषार पाटील तसेच शिपाई सागर भाऊ यांनी परिश्रम घेतले.