यावल न्युज : हर्षल आंबेकर
BJP Tiranga Raily for Yawal देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज,१५ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीच्या यावल तालुका तर्फे यावल मंडळाने शहरात भव्य तिरंगा यात्रेच आयोजन केले होते. या यात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बोरावल गेट येथून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा शहराच्या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली आणि तहसील कार्यालयाजवळ तिचा समारोप झाला. या दरम्यान, यावल शहरातील विविध महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. हातात तिरंगा ध्वज घेतलेले नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते.
देशभक्तीपर गीतांच्या गजरात आणि 'भारत माता की जय', 'वंदे मातरम'च्या जयघोषात ही यात्रा पुढे सरकत होती. या यात्रेमुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. यात्रेनंतर तहसील कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. सहभागी झालेल्या सर्वांनी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिनाचा हा क्षण साजरा केला.
त्यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी.यावल तालुका अध्यक्ष सागर कोळी.भूषण फेगडे. विलास चौधरी. उज्जैन सिंग राजपूत.डॉ कुंदन फेगडे.भरत पाटील.हर्षल पाटील.अतुल भालेराव.योगेश चौधरी.नितीन महाजन.राहुल बारी. प्रितेश बारी. विक्की सोनवणे. नितीन बारी.आदी सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते