रावेर न्युज नेटवर्क :
Statement to the Tehsildar by Raver Revenue Association रावेर – दि. 17 ऑगस्ट रोजी रावेर तालुका तलाठी मंडळ अधिकारी संघटनेतर्फे निवासी नायब तहसीलदार तायडे साहेब यांना निवेदन देण्यात आले. 2025-26 या वर्षाकरिता शेतकरी स्तरावर दिनांक 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेल्या DCS ई-पिक पाहणी ॲपमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली.
ॲप सुरुवातीला केवळ 3 ते 4 दिवस सुरळीत चालले, त्यानंतर सतत तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. शेतकरी आपल्या पिकाची नोंदणी 14 सप्टेंबरपर्यंत करू शकतात, परंतु ॲपमध्ये GPS लोकेशन चुकीचे दाखवणे, उपलब्ध क्षेत्र असूनही शून्य क्षेत्र दाखवणे, सतत ‘लोडिंग’ प्रक्रिया सुरू राहणे, हेल्पडेस्ककडून समाधानकारक उत्तर न मिळणे अशा अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे शेतकरी पिकांची नोंदणी करू शकत नाहीत आणि नाराजी व्यक्त करत महसूल कार्यालयांचा धाव घेत आहेत.
संघटनेतर्फे तहसीलदारांकडे मागणी करण्यात आली की, सदर ॲप तातडीने कार्यक्षम करण्यात यावे व शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पीक पाहणीची मुदत वाढवावी.
या वेळी तालुका संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे, सचिव गुणवंत बारेला, सहसचिव रवी शिंगणे, मंडळ अधिकारी यासिन तडवी, निलेश धांडे, प्रवीण वानखेडे, तलाठी शरद सूर्यवंशी, बर्वे मॅडम, काजल पाटील, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष सचिन कोळी तसेच तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व महसूल सेवक उपस्थित होते.