यावल न्युज : हर्षल आंबेकर
Hingona sant sena maharaj festival news यावल तालुक्यातील हिंगोणा येथे संतश्रेष्ठ श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी नाभिक समाज बांधवांच्या उपस्थितीत उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांसह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम मंदिरामध्ये संत सेना महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक प्रार्थना व आरती करून संतांच्या कार्य व विचारांना अभिवादन केले. भक्तीमय वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये आध्यात्मिक समाधान लाभले.
या प्रसंगी गजानन बोरणारे, उत्तम सोनवणे, लीलाधर सोनवणे, हर्षल आंबेकर, विकी आंबेकर, राकेश सोनवणे, शुभम सोनवणे, विजय सोनवणे, निलेश आंबेकर, रवींद्र आंबेकर, चेतन बोरणारे, भूषण सोनवणे, सुरेश सोनवणे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.