फैजपूर येथे संत शिरोमणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

यावल न्युज : हर्षल आंबेकर
Faizpur sant sena maharaj festival news फैजपूर (ता. यावल) येथे दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी समाजातील ज्येष्ठांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली. कार्यक्रमात समाजातील जाणकारांनी आपले विचार व्यक्त करताना, नाभिक समाज हा भिक्षा मागणारा समाज नसून सर्वांना आपलेसे करणारा समाज आहे, असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर तरुणाई व्यसनापासून दूर राहावी, समाजातील एकात्मता टिकवून ठेवावी, समाज एकत्रित राहून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी यावर भर देण्यात आला.

तसेच महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने महिलांनीही पुढाकार घ्यावा, समाजकार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी मोलाची सूचना उपस्थित महिलांनी मांडली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाजाचे अध्यक्ष बंटी आंबेकर, दीपक न्हावी, प्रमोद जगताप, अविनाश शिवरामे, अनिल मानकरे, छोटू सनंसे, चंदू निकम, सागर जाधव तसेच सर्व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने