पुणे पिंपरी-चिंचवड :- यावल न्युज हर्षल आंबेकर
आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेवा पाटीदार समाजाचा ‘समता भ्रातृ मंडळ’ (पिंपरी-चिंचवड) आणि ‘लेवा पाटीदार मित्र मंडळ’ (सांगवी) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वधू-वर मेळावा शनिवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी ऑनलाइन विनामूल्य नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी www.samatabhratrumandal.com या संकेतस्थळावर जाऊन ५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन मंडळाचे सचिव श्री. रवींद्र बऱ्हाटे यांनी केले आहे.
मेळाव्याचे आयोजन पिंपरी-चिंचवड मधील ह्या परिसरात होणार असून, स्थळाचे तपशील लवकरचं मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाची उत्तम तयारी व व्यवस्थापनासाठी श्री. रघुनाथ फेगडे यांचे सहकार्य लाभणार आहे.
यावर्षीच्या मेळाव्यासाठी ३००० पेक्षा जास्त वधू-वरांची नोंदणी होण्याची अपेक्षा असून, २००० वधू-वर व पालक उपस्थित राहतील, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री. हेमंत झोपे यांनी दिली.
लेवा पाटीदार समाजाच्या स्थैर्य व बळकटीसाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण असून, समाजाच्या एकोप्यासाठी हा मेळावा एक उत्तम माध्यम ठरणार आहे.
मेळाव्यासाठी नोंदणीसंबंधी अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून, डॉ. निनाद वायकोळे हे तंत्रज्ञान विकास प्रमुख म्हणून कार्य पाहणार आहेत.
तसेच मंडळाने वधू-वर व पालकांसाठी Android Application देखील विकसित केले असून, अल्पदरात Google Play Store वरून ते सहज डाउनलोड करता येईल. तसेच अधिक माहितीसाठी Toll Free Number: 02071173733 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.