जनविश्वास सप्ताहाचे आ. अमोलदादा जावळे यांनी केले उदघाट्न
यावल न्युजः
युवती सशक्त झाली तर कुटुंब, समाज आणि देशही सशक्त होतो.आजच्या काळात मुलींनी शिक्षण, आत्मरक्षण आणि डिजिटल सजगतेबाबत अत्यंत सावध व गंभीर राहावे. स्वतः बद्दल आत्मविश्वास बाळगून सामाजिक यंत्रणा सक्षम करावी असे प्रेरणादायी आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी कॅबिनेट मंत्री आमदार अनिलदादा पाटील यांनी केले.राष्ट्रवादी युवती काँग्रेसने रावेर लोकसभा मतदार संघात आयोजित केलेल्या जनविश्वास सप्ताहाच्या शुक्रवारी पाचव्या दिवशी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.रावेर-यावल विधानसभा मतदारसंघांचे आमदार अमोलदादा जावळे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील पूज्य साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
जिल्हाध्यक्षा कु.भाग्यश्री विवेक ठाकरे यांच्या संकल्पनेतून सजग युवती-सक्षम युवती व एक झाड माझ्या दादांचं...! असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्त याप्रसंगी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील,यावल पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व सुप्रसिद्ध व्याख्याते हर्षल पाटील, युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा अभिलाषा रोकडे,महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या लताताई राठोड, शहराध्यक्ष राजेश करांडे,महिला जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, तालुकाध्यक्ष रितेश पाटील, युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे,युवक शहराध्यक्ष योगेश पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस वासुदेव नरवाडे, मुख्याध्यापक एम.के.पाटील, पर्यवेक्षक विजय नन्नवरे आदी उपस्थित होते.
युवतींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि डिजिटल सक्षमीकरणाबरोबरच त्यांच्यामध्ये आत्मभान निर्माण करण्यासाठी जनविश्वास सप्ताह आयोजित केल्याचे आपल्या प्रास्ताविकातून कु.भाग्यश्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.आमदार अमोलदादा जावळे यांनी आपल्या उदघाट्नपर मनोगतात युवती सक्षमीकरणाचे मोल अधोरेखित करत शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊंपासून ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी वाटचालीचे दाखले दिले.चिकाटी,आत्मविश्वास आणि ध्येयवेडी जिद्द हे यशाचे खरे शस्त्र आहे असे नमूद करत युवतींनी आपली स्वप्ने मोठी ठेवावीत आणि स्वतःच स्वतःची ताकद बनावे असे विचार मांडले.
व्याख्यात्यांच्या मौलिक विचारांनी मिळाली प्रेरणा :
हर्षल पाटील यांनी आजच्या युगाची तू जिजाऊ,तूच सावित्री आणि तूच उद्योगिनी या विषयावर अत्यंत प्रभावी आणि संवादात्मक मार्गदर्शन केले. त्यांनी जिजाऊंची शौर्यशाली भूमिकाही उपस्थित मुलींना सांगितली आणि आधुनिक काळातील गृहउद्योग, डिजिटल कौशल्य, शाश्वत अर्थाजन याबाबत माहिती दिली.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी ‘सायबर क्राइम’ आणि ‘सोशल मीडियावरील सावधगिरी’ यावर विद्यार्थिनींना उपयुक्त मार्गदर्शन केलं. त्यांनी मुलींना कोणत्याही ऑनलाईन फसवणुकीपासून कसं सुरक्षित राहायचे ? याविषयी प्रत्यक्ष उदाहरणे दिली.
वटवृक्षाचा दरसाल वाढदिवस साजरा करणार
गायत्री कोळी,सायना तडवी, पुनम फेगडे,नेहा काटकर, चैताली धनगर,जयश्री धनगर, रूपाली तेली,प्रांजल पाटील, किशोरी बारी व चंचल सोनवणे
या दहा युवतींनी वटवृक्षाचे रोपटे स्विकारून आम्ही या झाडांचं अत्यंत काळजीपूर्वक संगोपन करणार असून आता दरवर्षी अजितदादांच्या वाढदिवसाच्या दिवशी या झाडांचा सुद्धा आम्ही वाढदिवस साजरा करू असा संकल्प कार्यक्रमांमध्ये सोडला.